Homeक्राईमहोळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीला आळा : वानवडी पोलिसांची मोठी कारवाई, ११५०...

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीला आळा : वानवडी पोलिसांची मोठी कारवाई, ११५० लिटर हातभट्टी दारू जप्त, दोघांना अटक 

लोक वार्ता – बबलू (राज) राठोड

पुणे | दि. ०२ मार्च २०२६ – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असलेल्या वानवडी पोलीस स्टेशन च्या तपास पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि वाहनांसह एकूण ५ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी वानवडी पोलिसांची ही कारवाई विशेष महत्त्वाची ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार:

दि. ०२/०३/२०२६ रोजी होळी सणानिमित्त पोलीस पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दया शेगर व अभिजीत चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली. हातभट्टीची गावठी दारू कारमधून विक्रीसाठी ढोबरवाडी येथे आणण्यात आली आहे, अशी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार पोलिसांनी ढोबरवाडी, घोरपडी परिसरात सापळा रचला.

संशयित वाहनासह दोन आरोपी ताब्यात:

कारवाईदरम्यान संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता दोन इसम आढळून आले,

लियाकत रोहीत अब्बासी (वय ३२ वर्षे, रा. ढोबरवाडी, सोपानवाग, पुणे)

समीर संजय राठोड (वय २३ वर्षे, रा. शिंदवणे काळे शिवार, ता. हवेली, जि. पुणे)

वाहनाची झडती घेतली असता ३५ लिटर क्षमतेचे प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले एकूण ३३ हत्ती कॅन, म्हणजेच १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली.

वाहनांसह मुद्देमाल जप्त:

या कारवाईत दारूसह वाहतुकीसाठी वापरलेला महीद्रा कंपनीचा सुप्रो मिनी ट्रक (MH-12/SX-4668) जप्त करण्यात आला आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५लाख ६५हजार ५०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५२०/२०२५ नुसार Maharashtra Prohibition Act कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे, श्री. भाऊसाहेब पाटील तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले व अर्षद सय्यद, यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!