लोक वार्ता –बबलू (राज)राठोड
पुणे : आठ महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने अटक केली आहे. पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे (वय ३१, रा. घोरपडी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा, युनिट-४ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार दि. ०४/०३/२०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, आठ महिन्यांपूर्वी नानापेठ येथील दुर्गा निवास अपार्टमेंटमध्ये घरफोडी करणारा आरोपी पार्थ भांडे हा येरवडा मेट्रो स्टेशनजवळील ताडी गुत्ता परिसरात येणार आहे. त्याने ग्रे रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स परिधान केली असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे असल्याचे सांगितले. पुढील तपासात त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
या संदर्भात समर्थ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता गु.र. नं. १४३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा पाहिजे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीस पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास तेथील पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
ही कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे), पुणे शहर निखिल पिंगळे व मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली,युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, विशाल इथापे, नागेशसिंग कुंवर, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ तसेच महिला पोलीस अंमलदार रोहिणी पांढरकर यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.




















