Homeक्राईमबंडगार्डन पोलीस स्टेशन, वाढदिवसासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; रिक्षासह १० हजारांची...

बंडगार्डन पोलीस स्टेशन, वाढदिवसासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; रिक्षासह १० हजारांची रोकड जप्त

लोक वार्ता – बबलू ( राज )राठोड

पुणे : वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या पत्नीकडून ऑनलाईन २५ हजार रुपये उकळणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात वापरलेली रिक्षा आणि खंडणीतील १० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे.

फिर्यादी हे मूळचे ग्राम जहाँगिरपुर, पोस्ट सुमई शाहपुर, थाना बनीयापुर, जिल्हा छपरा सारंग (बिहार) येथील रहिवासी असून त्यांचा मित्र पुण्यात आला असताना ही घटना घडली. रिक्षामधील चार अनोळखी इसमांनी त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली

आणि त्याच्या पत्नीशी संपर्क साधून ऑनलाईन २५,००० रुपये पाठवण्यास भाग पाडले.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ४०/२०२६ अन्वये भा. न्याय संहिता कलम ३०८ (५), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे उलगडा:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे गुलटेकडी परिसरात संशयितांचा शोध घेण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार :

दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी १)गणेश आण्णा जगधने वय २९ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल, गुलटेकडी, पुणे २) अमोल उत्तम गायकवाड वय ३२ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे

या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी. १) अतुल रविंद्र गायकवाड वय ३८ वर्षे रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे २) संतोष राधाकिशन सरोदे वय ३१ वर्षे रा. सदर. या दोघांनाही अटक करण्यात आली.

रिक्षा आणि रोकड जप्त:

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली असून खंडणीतील २५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेबाबत तपास सुरू आहे.

शहरात वाढत्या खंडणीप्रकरणांमुळे चिंता:

सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांना लक्ष्य करत वाढदिवसासारख्या कारणांसाठी खंडणी उकळण्याचा हा प्रकार गंभीर मानला जात आहे. मात्र बंडगार्डन पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्याचा वेगाने उलगडा झाला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!