Homeक्राईममसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल, स्थानिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह 

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धडक कारवाई करत ५ पीडित महिलांची सुटका केली. मात्र, या कारवाईनंतर स्थानिक भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी “योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटर” येथे बेकायदेशीररित्या महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून अचानक छापा टाकला.

या छाप्यात मसाज सेंटरमध्ये असलेल्या ५ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच सेंटर चालवणाऱ्या दोन आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असताना स्थानिक भारती विद्यापीठ पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार : ज्या ठिकाणी मसाज सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय सुरू होते, तेथून थोड्याच अंतरावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या, अंकित असलेली पोलीस चौकी देखील आहे, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालताना व पेट्रोलिंग करताना, पोलिसांच्या लक्षात कसे आले नाही ., असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई थेट, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेने केल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या गुप्त माहिती यंत्रणेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही चर्चा रंगली असून, अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय पोलिसांच्या नजरेआड कसे राहतात, याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई जरी प्रभावी ठरली असली तरी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झालेले प्रश्न आता अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, श्री. शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, नदाफ, भुजबळ, म.पो. अंमलदार कंक, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!