लोक वार्ता – राज राठोड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत हिंजवडी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण सुमारे २७.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २४ मार्च २०२६ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाकड येथील विनोदे वस्ती परिसरात सापळा रचला. त्यावेळी चारचाकी वाहनातून एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ विक्रीसाठी येणाऱ्या अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. पाथरगाव, ता. मावळ) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या ताब्यातून ४२ ग्रॅम एम.डी. ड्रग्स (किंमत सुमारे ४.२० लाख रुपये) तसेच वाहनासह एकूण ३.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीचा साथीदार शाहरुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही गोवंडी येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून २०० ग्रॅम एम.डी. ड्रग्स (किंमत सुमारे २० लाख रुपये) हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गु.र. नं. १८४/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(ब)(क), २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर सोो. पोलीस सह आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. सारंग आवाड सो. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्री. डॉ. बसवराज तेली सो. अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग), मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि.२, पिंपरी चिंचवड, मा. श्री. बाळासाहेब कोपनर सहा. पोलीस आयुक्त, हिंजवडी विभाग पिं चि यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार, नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी यांनी केली आहे.




















