Homeक्राईमपर्वती पोलीस स्टेशन, मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश : चौघांना अटक; ८...

पर्वती पोलीस स्टेशन, मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश : चौघांना अटक; ८ मोबाईल व चोरीची मोटरसायकल जप्त 

लोक वार्ता –राज राठोड

पुणे : शहरात रस्त्याने मोबाईलवर बोलत एकटे चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत स्पोर्ट्स बाईकवर भरधाव वेगात येऊन मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ८ मोबाईल फोन आणि चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत अलीकडे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. रस्त्याने मोबाईलवर बोलत चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत स्पोर्ट बाईकवर येणारे चोरटे अचानक मोबाईल हिसकावून भरधाव वेगात पसार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनांचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या वेळी पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांनी संशयित बाईकचा शोध घेतला असता ती यमाहा आर-१५ मोटारसायकल नवी मुंबई येथून चोरीस गेल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या बाईकच्या मूळ मालकाशी संपर्क साधत तसेच वाहतूक पोलिसांनी काढलेल्या चलनाच्या माहितीचा आधार घेत आरोपींचा माग काढला.

त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी चौघा आरोपींना पकडले. चौकशीत त्यांच्या ताब्यातून ८ मोबाईल फोन व चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

१) अर्जुन कमलेश सरोज, वय १८ वर्षे सध्या रा. कार्तिकेश्वर हॉटेल शाखा नंबर ०३ त्रीमुर्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे मुळ रा. राज्य उत्तर प्रदेश.

२) इमरान शफीक शेख वय १८ वर्षे, रा. रॉयल जीम जवळ ऊंड्री चौक, पुणे व सेक्टर नं १९, पुनीत कॉर्नर, कोपरीगाव, नवी मुंबई मुळ रा. राज्य झारखंड,

३) रवीकुमार राजेंद्रकुमार वय २१ वर्षे रा. रॉयल जीम जवळ ऊंड्री चौक पुणे मुळ रा. उत्तर प्रदेश,

४) प्रदिप कुमार महेंद्रकुमार वय २१ वर्षे रा. किर्तीश्वर हॉटेल, शाखानंबर ०३, त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे मुळ रा. राज्य उत्तर प्रदेश अशी असुन ते सर्व परप्रांतीय आहेत.

या सर्व आरोपींविरुद्ध पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०४ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मूळ मालकांना मोबाईल परत करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे 

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, मनोज बनसोड, नाना सोखाडे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, राकेश सुर्वे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!