Homeक्राईमबुधवार पेठेत देहव्यापार रॅकेटवर पोलिसांची धाड;४ बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

बुधवार पेठेत देहव्यापार रॅकेटवर पोलिसांची धाड;४ बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

लोक वार्ता – राज राठोड

या प्रकरणी बांगलादेशी आरोपी एजंट यानी महिलांना ब्युटी पार्लर किंवा टेलरिंगच्या कामाचे आमिष दाखवून भारतात आणले होते. त्यानंतर त्यांना धमकावून व पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे उघड झाले.

बांगला देशी एजंट मुल्ला, बाबु भैय्या ऊर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (वय २६, रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ), घरमालकीण मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील जनता बिल्डिंग येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर फरासखाना पोलिसांनी छापा टाकत चार बांगलादेशी महिलांची सुटका केली असून आरोपी भोपसिंग राजपूत (रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपी झोन-१ ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भसमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जावळगी व त्यांच्या पथकाने ५ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेत बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान चार बांगलादेशी महिला व एक बांगलादेशी पुरुष आढळून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी या महिलांना ब्युटी पार्लर किंवा टेलरिंगच्या कामाचे आमिष दाखवून भारतात आणले होते. त्यानंतर त्यांना धमकावून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (१), (३), ३ (५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी आरोपी भोपसिंग राजपूत याला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

फरासखाना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!