लोक वार्ता –राज राठोड
पुणे : आंबेगाव परिसरातील चितळे बंधु दुकानात घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्यासह एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.१५ वाजता ते २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास, विंडसर काऊंटी सोसायटी, दत्तनगर-नऱ्हे रोड, आंबेगाव, पुणे येथील वेद फुड – चितळे बंधु गाळा क्रमांक १४ व १५ चे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानुसार आरोपी ओमकार मारुती देडे (वय २१, व्यवसाय – साफसफाई, रा. किरकटवाडी, धायरी, पुणे) तसेच एका विधीसंघर्षीत बालकाला पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
तपासात सदर आरोपींनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या कडून एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
यामध्ये –
आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि. क्र. ३१/२०२६
आंबेगाव पोलीस स्टेशन गु.रजि. क्र. ३४/२०२६
विमानतळ पोलीस स्टेशन गु.रजि. क्र. ३८५/२०२३
या गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून सुमारे १ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये ऑटो रिक्षा, मोटारसायकल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर हे करत आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे. श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने केली.




















