लोक वार्ता –राज राठोड
पुणे : अपहरण करून गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे:
फिर्यादी, हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दिनांक ०७/१२/२०२५ रोजी सायंकाळी ८ ते ०८/१२/२०२५ च्या रात्री १ वाजेच्या सुमारास ( इंस्टाग्राम ओळख झालेल्या ) एका विधिसंघर्षीत मुलीने त्यांना कात्रज चौकात भेटायला बोलावले. प्रकाश जोरी हे त्या मुलीसोबत बाईकवरून कात्रज घाटाकडे जात असताना, मुलीचे साथीदार राहुल शितोळे, ऋषिकेश सुरते, आणि एका इन्स्टाग्राम अकाऊंट धारकासह अन्य दोघांनी त्यांना थांबवले.
या आरोपींनी जोरी यांना जबरदस्तीने येवलेवाडी येथे नेले. तेथे अक्षय शेलार आणि त्याचे दोन साथीदारही आले. या सर्वांनी मिळून फिर्यादी प्रकाश जोरी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर आरोपींनी प्रकाश जोरी यांना (पोक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी त्यांनी ७० हजार रुपये खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या फिर्यादीने तत्काळ रोख १० हजार रुपये खंडणी म्हणून त्यांना दिले. मात्र, उर्वरित खंडणीच्या रकमेसाठी आरोपी फिर्यादीला सतत फोन करून धमकी देत होते.
या त्रासाला कंटाळून अखेरीस फिर्यादीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंद केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले.
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, आणि तुकाराम सुतार यांचे तपास पथक तांत्रिक माहिती आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते.
दिनांक १०/१२/२०२५ रोजी रात्री ९ वाजता पोलिसांनी सापळा रचून खंडणीच्या गुन्ह्यात सामील असलेले तीन मुख्य आरोपींना अटक केली:
अक्षय गंगाधर बुधेवार (वय-२२, रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे)
अमोल अंकुश शिंदे (वय-२८, रा. कर्वेनगर, कोथरूड, पुणे)
राहुल तानाजी शितोळे (वय-२३, रा. महादेवनगर, शेलार मळा, कात्रज, पुणे)
यासोबतच, गुन्ह्यात सामील असलेल्या एका विधिसंघर्षीत मुलीसही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत.
भारती विद्यापीठ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे खंडणीचे किंवा धमकावण्याचे आणखीन गुन्हे कोणासोबत घडले असल्यास, त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय भारती विद्यापीठ पोलिसांना संपर्क साधून माहिती द्यावी. नागरिकांनी निर्भीडपणे पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार, नागेश पिसाळ, महेश बारवकर, मंगेश पवार, नवनाथ खताळ, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.




















