लोक वार्ता –राज राठोड
पुणे: अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा संदेश देत वाघोली पोलिसांनी विक्रीसाठी आणलेला तब्बल १ किलो ५०२ ग्रॅम गांजा जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एकूण २ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या सूचनांनुसार तपास पथक रेकॉर्डवरील आरोपींचे चेकिंग करीत पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार पांडुरंग माने व साई रोकडे यांना वाघेश्वरनगर, गोरेवस्ती, भैरवनाथ तळे परिसरात काळ्या काचा असलेला संशयित पांढरा टेम्पो उभा दिसून आला. टेम्पोमध्ये चालक नसल्याने थोडे अंतरावरून पोलिसांनी लक्ष ठेवले.
काही वेळातच तीन इसम तेथे येऊन टेम्पोमध्ये बसताच पोलिसांनी त्वरित धाव घेत तपास केला. चौकशीदरम्यान तिघेही गडबडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे—
१) सौरभ अशोक साबळे (23, रा. रणगाव, इंदापूर)
२) समर्थ दत्तात्रय बनसोडे (23, रा. कळंब, इंदापूर)
३) अमिन रहिमतुल्ला डांगे (23, रा. वालचंदनगर)
पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे यांनी टेम्पोची झडती घेतली असता ३० हजार रुपये किंमतीचा गांजा, ३८ हजारांचे मोबाईल व २ लाखांचा टेम्पो असा एकूण २ लाख ६८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ४, पुणे शहर, सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री. युवराज हांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), आसाराम शेटे, पोलीस उप निरीक्षक मनोज बागल, पोलीस उपनिरीक्षक संदिप करपे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, यांनी केली आहे.




















