Homeक्राईमपुण्यातील घरफोडी प्रकरण उघड – सराईत गुन्हेगार व विधीसंघर्षीत बालक पोलिसांच्या ताब्यात  

पुण्यातील घरफोडी प्रकरण उघड – सराईत गुन्हेगार व विधीसंघर्षीत बालक पोलिसांच्या ताब्यात  

लोक वार्ता –राज राठोड

पुणे: शहरातील समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दिवसा घरफोडी प्रकरणाचा अखेर पोलिसांनी छडा लावला.

दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठेतील फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. या दरम्यान घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठांच्या आदेशानुसार तपासपथक व गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनिल मल्हारी तलवारे (वय ३८, रा. आकुर्डी, पुणे) व एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात उघड झाले की चोरी केलेले दागिने त्यांनी आपल्या साथीदाराकडे विक्रीसाठी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा (वय ४०, रा. चिखली, पुणे) याला देखील अटक केली.

या तिघांकडून पोलिसांनी ८लाख ११हजार रुपयांचा मुद्देमाल (सोन्या-चांदीचे दागिने व १०हजार रुपये रोख) जप्त केला आहे.

सखोल तपासात आरोपींनी खराडी पोलीस स्टेशन, चंदन नगर पोलीस स्टेशन तसेच रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत देखील घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.  

पोलिसांच्या दक्षतेमुळे सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले असून नागरिकांनी सतर्क राहणे हीच काळाची गरज आहे:

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार वाहन चोरी व दरोडा पथक २ कडील सहा. पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!