Homeक्राईमबाणेर पोलिसांची कामगिरी : चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी मुंबईतून अटक : आरोपी...

बाणेर पोलिसांची कामगिरी : चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी मुंबईतून अटक : आरोपी हा पॅरोलवरून फरार होता.

लोक वार्ता –राज राठोड

पुणे, दि. २४ ऑक्टोबर २०२५ बाणेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या फिर्यादीवरून सराईत आरोपी निलेश विष्णू कदम (वय ३१, रा. दुरशेट, खांबेवाडी, ता. खालापुर, जि. रायगड) यास अखेर मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या दुकानात कामाला होता. त्याने दुकानातील कॅश बॉक्समधून १५ हजार रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असा एकूण २९ हजार चा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी हा कमी पगारावर विविध दुकानांमध्ये काम करून चोरी करण्याचा सराईत प्रकार करीत असल्याचे समजले.  – यापूर्वी आरोपीवर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.न. १९५/२०२३ भादवि कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यात शिक्षा झालेली आहे.  – तसेच कणकवली पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ९८/२०२३ भादवि कलम ३८०, ४५७, ५११ अंतर्गत गुन्हा दाखल असून आरोपी पॅरोल रजेवरून फरार होता.

विश्वसनीय बातमीदारामार्फत आरोपी मुंबईत काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांनी तपास पथक मुंबईत रवाना केले.  सपोनि कैलास डाबेराव व पोलीस अंमलदार अहेर, शिंगे यांनी मुंबईत शोध घेऊन आरोपीस दि. १० डिसेंबर २०२५ रोजी अटक केली.  तपासात आरोपीने चोरी केलेले मोबाईल बाहेर राज्यात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अहेर करीत आहेत.

पोलिसांकडू दुकानदारांना सूचना : दुकानात कामासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती स्थानिक पोलिसांना देणे हे महत्त्वाचे आहे,

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४. पुणे शहर, श्री. चुलूमुला रजणीकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, गणेश गायकवाड, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, प्रतिम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रविण गव्हाणे, रोहित पाथरुट, स्वप्नील मराठे बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!