लोक वार्ता – राज राठोड
पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांनी नवले पूल ते कात्रज दरम्यान सर्व्हिस रोडवर सापळा रचून एका विधीसंघर्षित बालकाला (अल्पवयीन मुलगा) ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
तपास पथकातील अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
तपासात समोर आले की, हा कट्टा सोमनाथ चांदणे नावाच्या साथीदाराने त्याला पुरवला होता.
दोघांविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




















