लोक वार्ता –राज राठोड
पुणे शहरातील काही लॉजच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवल्या जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही महिला व पुरुष एजंट अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष, प्रेमाचे जाळे किंवा अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत या व्यवसायात ढकलत असल्याचे उघड झाले आहे. अशाच एका प्रकरणात धनकवडी, बालाजीनगर येथील श्री साई लॉजिंग येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस यांनी छापा टाकून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणी एक महिला व दोन पुरुषांविरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी :
पुणे, दि. १३ फेब्रुवारी २०२६ – अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस यांच्या पथकाने कारवाई करत वेश्याव्यवसायातून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली असून एक महिला एजंट व दोन पुरुष आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही महिला व पुरुष एजंट अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ पडताळणी केली व खात्री करून धनकवडी येथील श्री साई लॉजिंग येथे अचानक छापा टाकण्यात आला,
या कारवाईत महिला आरोपी नामे १) वर्षा शंकर शिरसाठी वय ३५ वर्षे, रा. कामीनी हॉटेल जवळ विजय नगर, चिंचवड गाव पुणे. २) अनिल मदन जेधे वय ३५ वर्षे रा. पेपर मिल समोर, साने चौक, चिंचवड पुणे ३) जिवन प्रमादे इंगोले वय ३३ वर्षे, श्री साई लॅजिंग स.नं. ३०, नित्यानंतद सोसायटी, बालाजी नगर बस स्टॉप शेजारी, पुणे सातारा रोड, धनकवडी पुणे, यांना अटक करण्यात आली. आरोपींनी संबंधित लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ पीडित मुलीची सुटका केली.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १४३, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४ व १७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. श्री. शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार इम्रान नदाफ, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, म. पोलीस अंमलदार रेश्मा कंक, इंगळे गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली




















