लोक वार्ता – राज राठोड
पुणे : वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस यांच्या युनिट-६ गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील अट्टल वाहन चोराला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २९/०१/२०२६ रोजी हडपसर परिसरातून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी युनिट-६चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी विशेष पथक तयार करून चोरीस गेलेल्या वाहनांचा व आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बापुराव तुकाराम तुपे चौक, अमनोरा पार्क सोसायटीमागे दोन युवक संशयास्पद अवस्थेत हिरो डिलक्स मोटारसायकलसह थांबले असल्याचे समजले. संबंधित मोटारसायकलवर नंबर प्लेट नव्हती व ती चोरीची असल्याचा संशय होता.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून १ विधीसंघर्षित बालक तसेच,पवन तानाजी माने (वय २२, रा. लोहगाव, पुणे)
प्रतिक शिवाजी अस्वरे (वय २०, रा. चिचगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी आणखी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या मोटारसायकली जप्त केल्या.

उघडकीस आलेले गुन्हे :
हडपसर पोलीस स्टेशन – ६ गुन्हे
दिघी पोलीस स्टेशन – १ गुन्हा
चंदननगर पोलीस स्टेशन – १ गुन्हा
या कारवाईत एकूण सुमारे ₹७,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
युनिट-६ गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे हडपसर व परिसरातील वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे व मनिषा लोंखडे यांनी केलेली आहे.




















