Homeक्राईमशटर उचकटून इलेक्ट्रिकल वायरची चोरी ; फरासखाना पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद, २...

शटर उचकटून इलेक्ट्रिकल वायरची चोरी ; फरासखाना पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद, २ अल्पवयीन ताब्यात

लोक वार्ता – राज राठोड

पुणे :फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दुकानाचे शटर उचकटून सुमारे १लाख २५हजार रुपयांच्या पॉलीकॅब वायरची चोरी करणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना अटक करण्यात आली असून २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री भारतीय इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिकल पॉलीकॅब वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी तपासाची दिशा ठरवत घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली.

पोलिस अंमलदार पासलकर, राठोड व खुट्टे यांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढला.

तपासादरम्यान आरोपी वडारवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ५ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी पुढील आरोपींना अटक केली आहे –

आदित्य संतोष बंडगर (वय २०)

प्रेम भाऊराव बोदडे (वय २१)

पवन संजय चव्हाण (वय १९)

तिघेही राहणार वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे.

तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत चोरीस गेलेल्या पॉलीकॅब वायर तसेच गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोपेड मोटारसायकली असा एकूण २लाख २६हजार १० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. वैभव गायकवाड, पोलीस उप-निरी. अरविंद शिंदे, पोलीस उप-निरी. संतोष गोरे, पोलीस अंमलदार कृष्णा निढाळकर, प्रविण पासलकर, महेश राठोड, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, आनंद माने, महेश पवार, शशिकांत ननावरे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!