Homeक्राईमबसमधील गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची चोरी करणाऱ्या दोघांना अटक : विश्रामबाग पोलिसांची...

बसमधील गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची चोरी करणाऱ्या दोघांना अटक : विश्रामबाग पोलिसांची धडक कारवाई; ३ गुन्हे उघड, ५ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त

लोक वार्ता – राज राठोड

दि. २१/०२/२०२५ | पुणे : बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक करून तब्बल ३ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. आरोपींकडून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ८७ हजाराचा, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याची घटना:

दि. ०२/०२/२०२६ रोजी दुपारी १.३० ते २.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आंबेडकर चौक, जकात नाका वारजे बसस्टॉप ते शनिवारपेठ या दरम्यान बसने प्रवास करत होते. केसरीवाडा बस स्टॉप, केळकर रोड, पुणे येथे बसमधील प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या उजव्या हातातील अंदाजे ३५,०००/- किंमतीची सोन्याची पाटली नकळत चोरून नेली.

या प्रकरणी गु.र. नं. १७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासाची दिशा आणि आरोपींची अटक:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना गुन्हा उघड करण्याचे आदेश देण्यात आले.

तपासादरम्यान पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून संशयितांची ओळख पटवली. गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने हडपसर, मुंढवा आणि कोंढवा परिसरात सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतले:

बसवराज विजय सुतार (वय २५, रा. केशवनगर मुंढवा, पुणे)

कृष्णा रमेश माने (वय ४५, रा. सरोदय कॉलनी, मुंढवा, पुणे)

चौकशीदरम्यान आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.

३ गुन्ह्यांचा उलगडा – मोठा मुद्देमाल हस्तगत:

पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर आरोपींकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून ४० ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत ५ लाख ८७ हजार इतकी आहे.

पुढील तपास सुरू:

सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार सचिन कदम करीत आहेत. बस प्रवाशांनी गर्दीच्या वेळी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषीकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त, श्री चंद्रकांत भोसले, श्री प्रदिप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी राजेश उसगावकर, सहा. पोलीस निरीक्षक, ‘पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, आशिष खरात, सागर मोरे, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, महिला पोलीस अंमलदार रेणुका पठारे, स्वाती बर्डे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!