लोक वार्ता –राज राठोड
पुणे : सायबर पोलीस स्टेशन. डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. आरोपींनी स्वतःला CBI अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये असल्याची भीती दाखवली.
या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे, आरोपीं नामे १) हर्षद सुभाष धनतोले, वय २३ वर्षे, सध्या रा. विकास मित्र मंडळ चौक, कर्वेनगर, पुणे मूळ रा. छत्रपती संभाजीनगर व २) समर्थ सुरेश देशमुख, वय २४ वर्षे, सध्या रा. लेन नं. १, आनंद कॉलनी, कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, अशी गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक माहितीसाठी :
सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं १४/२०२६, भा.न्या.सं.क ३०८ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३(५) सह आयटी अॅक्ट कलम ६६ (सी) (डी) या दाखल गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी सीबीआय ऑफीसर असल्याची बतावणी करुन जेष्ठ नागरीकास डिजीटल अरेस्ट करून त्यांच्या आधारकार्डद्वारे त्यांच्या नावे बँकेत बनावट खाते उघडण्यात आले असून सदरचे खाते एका इसमाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्हयात तपासादरम्यान सापडले असून सदरच्या खात्यावर लोकांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे यामध्ये तुम्हांला व कुटुंबातील सदस्यांना अटक होईल अशी भिती घालून त्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याकरीता फिर्यादी यांची सर्व गुंतवणुक आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर ट्रान्सफर करा अशी भिती दाखवून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडून त्यांची एकुण रु.१०,७४,६५,०००/- एकुण रक्कम रु. दहा कोटी चौ-याहत्तर लाख पासष्ट हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन श्रीमती स्वप्नाली शिंदे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासात फिर्यादी यांनी बैंक खात्यावर पैसे भरले त्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींनी ए.टी.एम. मधून काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झालेने सदर ए.टी.एम. तसेच इतर ठिकाणच्या सी.सी.टी.व्ही फुटेज ची पडताळणी करून सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आरोपींचा शोध घेऊन सापळा रचून, शिताफीने आरोपीं नामे १) हर्षद सुभाष धनतोले, वय २३ वर्षे, सध्या रा. विकास मित्र मंडळ चौक, कर्वेनगर, पुणे मूळ रा. छत्रपती संभाजीनगर व २) समर्थ सुरेश देशमुख, वय २४ वर्षे, सध्या रा. लेन नं. १, आनंद कॉलनी, कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेवून नमूद गुन्ह्यात अटक करून आरोपीतांकडून फसवणूकीच्या रकमेपैकी ४० लाख रूपये इतकी रक्कम गोठविली असून ४,७८,५००/- रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सायबर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर, श्री विवेक मासाळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, सहा पोलीस निरीक्षक अर्चना कटके, पोलीस उपनिरीक्षक सुशिल डमरे, पोलीस उपनिरीक्षक अजित बढे, पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, रविंन्द्र साळवी, म.पो.हवा जानव्ही भडेकर, पो. हवा. गंगाधर काळे पो.हवा. नवनाथ कोंडे, पो.हवा. चव्हाण, पो.हवा रजपूत, रामाने, सचिन शिंदे, विजय भोसले, लोकेश्वरी कटके, अदनान शेख भंडलकर, मांढरे, मारकड तसेच महिला पोलीस अंमलदार किरण गायकवाड, हंबीर सुप्रिया होळकर यांचे पथकाने केली आहे.




















