Homeक्राईमपुण्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखा युनिट ७ ची कारवाई; दोघांवर...

पुण्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखा युनिट ७ ची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल 

लोक वार्ता – बबलू (राज) राठोड

पुणे पोलीस अंतर्गत गुन्हे शाखा युनिट ७ ने बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ७ लाख ७३ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दि. ४ मार्च २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, वैद्यकीय अधीक्षक सचिन धस (ग्रामीण रुग्णालय, शिरूर) तसेच पंच यांच्या उपस्थितीत सापळा रचला.

डमी रुग्णाच्या मदतीने उघडकीस आला प्रकार:

बेकायदेशीर गर्भलिंगनिदान सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डमी महिला रुग्ण व तिच्या पतीच्या मदतीने कारवाई केली. एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद) याने संबंधित महिलेला खासगी वाहनातून ढोकसांगवी, ता. शिरूर येथील ‘लाईफ केअर क्लिनिक’मध्ये आणले.

लाईव्ह लोकेशनच्या आधारे पथकाने क्लिनिकवर छापा टाकला असता आरोपी आकाश सुभाष मलगुंडे (वय ३५, रा. ढोकसांगवी) हा छोट्या प्रोबच्या साहाय्याने मोबाईलला वायफायद्वारे जोडून अॅपच्या माध्यमातून सोनोग्राफी करताना आढळून आला. त्याच्यासोबत एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे (वय ५२, रा. केसनंद, ता. हवेली) यालाही ताब्यात घेण्यात आले.

क्लिनिक व वाहनातून साहित्य जप्त:

छाप्यात क्लिनिक तसेच एजंटच्या वॅगनार कारमधून गर्भलिंगनिदानासाठी वापरले जाणारे साहित्य व गर्भपातासाठी उपयोगात येणारी औषधे जप्त करण्यात आली. एकूण ७,७३,०७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पंचनामा कारवाई शासकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -७चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे व भरत गुंडवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे व कीर्ती मांदळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!