Homeक्राईमफुरसुंगीतील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; गुन्हे शाखा युनिट ६ कडून आरोपीला अटक

फुरसुंगीतील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; गुन्हे शाखा युनिट ६ कडून आरोपीला अटक

लोक वार्ता – राज राठोड
पुणे : फुरसुंगी पोलीस ठाणे हद्दीत अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ अखेर उलगडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला यश आले आहे. कोणतेही ठोस धागेदोरे किंवा स्पष्ट तांत्रिक पुरावे नसतानाही केवळ एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला अटक केली आहे.

३ मार्च २०२६ रोजी हडपसर-सासवड रोडलगत दिवे घाट पायथ्याशी काची कंपनी शेजारील मोकळ्या जागेत, वडकी परिसरात सुमारे ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाकडून सुरू होता. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेनुसार अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार अमित कांबळे, पोलीस हवालदार तानाजी देशमुख व युनिट ६ च्या पथकाने अत्यंत बारकाईने तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान मिळालेल्या एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला,

आरोपी प्रकाश बिभीषन माने, वय २९ वर्षे, व्यवसाय, खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर, रा. समीर आंबेकर यांच्याकडे भाडयाने, वडकी नाला, ता. हवेली जि पुणे. यास ताब्यात घेतले.

सखोल चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने संबंधित महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने प्रतिकार केल्याने संतापलेल्या आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. तसेच तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने कोणतेही ठोस धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे, पल्लवी मोरे, अनिल जामगे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!