Homeक्राईमस्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार...

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेकडून ४ पीडित महिलांची सुटका: महिला आरोपी अटकेत

लोक वार्ता – राज राठोड

कोंढवा परिसरात सलग कारवाई; काही दिवसांतच दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे.

पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरची महिला व्यवस्थापक अटकेत आहे. तिचा साथीदार असलेला एक पुरुष आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटमध्ये एका मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकत एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी संबंधित महिला व तिच्या पतीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच दुसऱ्या कारवाई मध्ये : दि. ७ मार्च २०२६ रोजी पोलिसांना पुन्हा एक गोपनीय माहिती मिळाली. कोंढवा येथील एन.आय.बी.एम. परिसरातील सनश्री वुड्स कमर्शियल प्रिमायसेस इमारतीत असलेल्या “ओपल स्पा अॅण्ड सलून या मसाज सेंटरमध्ये स्पा सेवांच्या नावाखाली महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला असता स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या कारवाईत टी झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय ३२) या स्पा व्यवस्थापक महिलेला ताब्यात घेण्यात आले. ती मूळची नागालँड राज्यातील असून सध्या कोंढवा परिसरात राहत होती.

छाप्यात चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी महिला व तिच्या साथीदाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (१), (३), ३ (५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे शहरात स्पा, मसाज सेंटर किंवा लॉजच्या आड सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांवर,अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेकडून कारवाईचा इशारा दिला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी सांगितले.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, अविनाश कोंडे तसेच महिला पोलीस अंमलदार खेडेकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!