Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या आवळल्या मुस्क्या : १० लाख...

काळेपडळ पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या आवळल्या मुस्क्या : १० लाख ७८ हजार रुपये किमतीच्या ६ रिक्षा जप्त

लोक वार्ता – राज राठोड

पुणे : रिक्षा चोरी करून त्या रिक्षांना स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे नंबर प्लेट लावून वापरणाऱ्या सराईत चोराला काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एकूण १० लाख ७८ हजार रुपये किमतीच्या ६ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांतील ५ रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

काळेपडळ पोलीस स्टेशन येथे रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले होते, त्याच अनुषंगाने

गुन्ह्याचा तपास करताना काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे, लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे व गिरीराज जगदाळे यांनी परिसरातील सुमारे १०२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

तपासादरम्यान पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीची एक रिक्षा पोखराई धरण परिसर, उंड्री (पुणे) येथे उभी आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून झाडाखाली उभी असलेली एमएच १२ एससी ५२२३ क्रमांकाची रिक्षा तपासली असता त्यात बसलेल्या इसमाला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव शादाब युसुफ अन्सारी (वय २५), रा. सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे असे सांगितले. पुढील तपासात आरोपी हा स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे नंबर प्लेट चोरीच्या रिक्षांवर बसवून त्या रिक्षा वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या तपासात काळेपडळसह चंदननगर, आंबेगाव, संत तुकारामनगर आणि वानवडी पोलीस ठाण्यांतील रिक्षा चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले. आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या ६ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत १०,७८,००० रुपये इतकी आहे.

आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली अतुलकुमार नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अमंलदार शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप वेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!