लोक वार्ता –राज राठोड
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत येरवडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा-२ च्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २०लाख ७०हजार ५०० किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
दि.२४/११/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, सुनील महाडीक, ऋषीकेश ताकवणे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर यांना वेद प्रोव्हीजन स्टोअर्स सर्वे नं.१४, नाईक नगर, येरवडा पुणे या दुकानामागे मागील गोडावुन मध्ये आरोपी नामे जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट, वय-२५ वर्ष रा. सर्वे. नंबर १४, नाईक नगर, येरवडा पुणे याचे ताब्यात २०लाख ७०हजार ५००/- किंमतीचा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ असा ऐवज जप्त करुन त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४, २७५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व२० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६(२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलिसांची ठोस भूमिका दर्शवते. नागरिकांनी अशा पदार्थांचा वापर टाळावा व समाजातील तरुणांना या घातक व्यसनापासून दूर ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे




















