Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई – रेकॉर्डवरील आरोपी श्वेतांग निकाळजे याच्याकडून दोन पिस्तुल...

भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई – रेकॉर्डवरील आरोपी श्वेतांग निकाळजे याच्याकडून दोन पिस्तुल जप्त

लोक वार्ता – राज राठोड
पुणे : भारती विद्यापीठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास फिर्यादीला त्याच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून भोर रोडवर नेण्यात आले. आरोपी श्वेतांग निकाळजे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीकडे लग्न करू नये व एअरटेल कंपनीच्या टॉवर कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत असा दबाव आणला.

या दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर दोन पिस्तुल लावून, तुला कोणत्या पिस्तुलमधून गोळी घालू? अशी धमकी दिली. तर इतर साथीदारांनी कोयत्याने डोक्यात वार करण्याची धमकी दिली. फिर्यादी त्यांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर आरोपींनी शिवाजीनगर येथे त्याच्या मित्रांना पकडून मारहाण केली व पुन्हा पिस्तुल लावून धमकावले.

या घटनेवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५०७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता व हत्यार कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांची कारवाई :
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे व अभिनय चौधरी यांच्या माहितीवरून आरोपी श्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. मंगळवार पेठ, पुणे) व ओम संजय गायकवाड (वय २६) यांना दि. २० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.

तपासादरम्यान श्वेतांग निकाळजे याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुल व चारचाकी गाडी असा एकूण ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना नागरिकांना सावधगिरीचा इशारा देणारी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध पोलीस यंत्रणा कठोर कारवाई करत असली तरी नागरिकांनीही अशा धमक्यांना बळी न पडता त्वरित तक्रार नोंदवावी.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!