लोक वार्ता –राज राठोड
पुणे : लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरोधात मोहिम राबविण्यात आली.
दि. ८ डिसेंबर रोजी मौजे लोणीकाळभोर येथील गुरुकृपा निवास, माळी मळा येथे छतावरील पत्र्याच्या शेडमध्ये पैशावर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत ११ इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जुगार साहित्य, मोबाईल फोन, ५ मोटारसायकली व रोख रक्कम मिळून एकूण ५,४३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळणारे इसम, घरमालक व अड्डा चालकाविरुद्ध गु.र.नं. ५५५/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत :
– अवैध दारूवर : १०३ कारवाया
– गांजा विक्रीवर : १४ कारवाया
– अवैध जुगारावर : ३६ कारवाया
– गुटखा विक्रीवर : १ कारवाई
अशा एकूण १५४ प्रभावी कारवाया केल्या आहेत. तसेच अवैध मटका चालविणाऱ्यांविरुद्ध एम.पी.डी.ए. कारवाई. व काहींना तडीपार करण्यात आले आहे.




















