लोक वार्ता – राज राठोड
२४ जुलै: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक महत्त्वाची कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाकडून चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या कारवाईसंदर्भात वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांनी तपास अधिकाऱ्यांना वाहन चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड व किरण साबळे यांनी वाहन चोरीचा तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान संशयित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ३४५/२०२५ अन्वये चोरीस गेलेली दुचाकी (क्रमांक MH12NR3012) सापडली. यानंतर अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी तीन चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या.
या चौकशीतून खालील चार गुन्हे उघडकीस आले:
१)भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन – २ गुन्हे.
२)सिंहगड रोड पोलीस स्टेशनमधील वाहन चोरीचा १ गुन्हा.
३)नांदेड सिटी पोलीस स्टेशनमधील वाहन चोरीचा १ गुन्हा.
एकूण चार वाहन चोरीचे गुन्हे या कारवाईतून उघडकीस आले असून, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, राजेश बनसोडे .पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, दिनेश टपके, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.




















