Homeक्राईमदोन अल्पवयीन मुलींचा शोध: ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना मोठे...

दोन अल्पवयीन मुलींचा शोध: ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना मोठे यश

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे, १३ ऑक्टोबर २०२५ — पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात मोठे यश मिळवले आहे. राजमाता जिजाऊ विद्यालय, कसबा पेठ येथे शिकणाऱ्या आणि स्वाधार अनाथालयात राहणाऱ्या १३ वर्षांच्या दोन मुली ७ ऑक्टोबर रोजी शाळेला जाण्यासाठी निघाल्या होत्या, शाळेत दोन्ही अल्पवयीन मुली पोहोचल्या नाही, या संदर्भात फरासखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १३७(२) नुसार नोंदवण्यात आला होता.

तपासाची सुरुवात आणि आव्हाने

प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव गायकवाड, पो.उ.नि. अरविंद शिंदे आणि पोलीस अंमलदारांच्या दोन स्वतंत्र पथकांनी तपास सुरू केला. मुली अनाथ असल्यामुळे त्यांचा शोध घेणे अधिक कठीण होते, कारण त्यांचे कोणतेही नातेवाईक अथवा ओळखीचे व्यक्ती उपलब्ध नव्हते.

कसबा पेठ, पवळे चौक, कुंभारवेस चौक आणि शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून एक मुलगी वाकडेवाडी येथे रात्रीच्या वेळी सापडली. मात्र दुसरी मुलगी अद्यापही बेपत्ता होती आणि पहिल्या मुलीकडून कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही.

८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान शिवाजीनगर, पाटील इस्टेट, संगमवाडी, बॉम्बे सॅपर चौक, विश्रांतवाडी, मॅगझीन चौक, दिघी, आळंदी, मोशी आणि भोसरी परिसरात ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अखेर पोलीस अंमलदार प्रविण पासलकर आणि प्रशांत पालांडे यांच्या पथकाला मोशीतील तुपे वस्ती, गणेश नगर परिसरात दुसरी मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेली आढळून आली. तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांची तत्परता आणि यशस्वी तपास

फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत चिकाटीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून दोन्ही मुलींचा शोध घेतला. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आणि दोन्ही मुली सुरक्षितपणे सापडल्या.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-१, श्री. कृषिकेश रावले, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. विवेक मासाळ, (अति.कार्य.) मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य.) उत्तम नामवाडे, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, संतोष गोरे, सपोफौ मेहबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर, पोलीस अमंलदार, प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड, चेतन होळकर, विशाल शिंदे, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, मनिषा पुकाळे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

error: Content is protected !!