Homeक्राईमकात्रज लेक टाऊन मध्ये दिवाळीच्या रात्री चोरीचा थरार — प्रसिद्ध मिठाईवाल्याच्या दुकानातील...

कात्रज लेक टाऊन मध्ये दिवाळीच्या रात्री चोरीचा थरार — प्रसिद्ध मिठाईवाल्याच्या दुकानातील २लाख २०हजार, रोकड लंपास

लोक वार्ता –राज राठोड 

पुण्यात दिवसेंदिवस चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे, दिवाळीच्या दिवशी दुकान बंद झाल्यानंतर चार चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध काका हलवाई मिठाईच्या दुकानात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे,

कात्रज, लेक टाऊन सोसायटीमधील प्रसिद्ध ‘काका हलवाई’ मिठाई दुकानावर दिवाळीच्या रात्री चार चोरट्यांनी चोरी केली. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमधून सुमारे २लाख २० हजाराची रोकड आणि २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरून नेण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी सकाळी ७ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती होती, त्यामुळे त्यांनी दुकानाला लक्ष्य केले. घटनेच्या दिवशी तक्रारदार यांनी रात्री ११ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.

मध्यरात्री चोरटे दुकानात आले आणि कटिंग टूल्सच्या साहाय्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी काउंटरमधील ड्रॉवरमधून रोकड व मोबाईल फोन चोरून नेला.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सांगितले की, लेक टाऊन सोसायटीमधील ‘काका हलवाई’ मिठाई दुकानावर दिवाळीच्या रात्री चार चोरट्यांनी चोरी केली . दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे त्यांनी घेऊन गेले आहे, चोरट्यांनी चेहऱ्यावर कपडे बांधले होते, दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरी केली. दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये त्यांचे फुटेज कैद झाले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!