Homeक्राईमराजेंद्रनगर भागात पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन पिस्तूल आणि एक काडतुससह तरुण...

राजेंद्रनगर भागात पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन पिस्तूल आणि एक काडतुससह तरुण जेरबंद

लोक वार्ता– राज राठोड

पुणे – विश्रामबाग पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राजेंद्रनगर परिसरात करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असताना पोलिस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांना माहिती मिळाली की, राजेंद्रनगर भागात सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक संशयित व्यक्ती थांबलेली आहे.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन तपास सुरू केला,

तपासादरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला आढळला. चौकशी केली असता त्याने आपले नाव मयुर सचिन भोसले (वय २०, रा. गणपत नगर, बिबवेवाडी, पुणे) असे सांगितले.

झडती घेतली असता त्याच्या ताब्यात दोन गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळून आले. जप्त केलेल्या शस्त्रांची अंदाजे किंमत १लाख,२०० एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २९०/२०२५ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करत आहेत.

पोलिसांची तत्परता कौतुकास्पद

राजेंद्रनगर परिसरातील पोलिसांची ही जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाई स्थानिकांमध्ये कौतुकास पात्र ठरली आहे. वेळेवर केलेल्या या कृतीमुळे संभाव्य गंभीर घटना टळल्याचे सूत्रांनी सांगितले.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१ पुणे शहर श्री. कृषीकेश रावले, मा. सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरुण घोडके यांचे सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल भासेले, जाकीर मणियार, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनिस शेख, नितीन बाबर, सागर मोरे, शिवा गायकवाड व राहुल माळी यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!