लोक वार्ता –राज राठोड
पुणे – शहरात जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या प्रयत्नात बंडगार्डन पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार:
शिंदे वाहनतळाकडून कात्रज बस स्टॉपकडे पायी जात असलेल्या एका नागरिकाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी मोबाईल हिसकावून जबरी चोरी केली. या घटनेवरून बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचे पथक पेट्रोलिंग दरम्यान फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून संशयित व्यक्तीचा शोध घेत होते. त्याच दरम्यान विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने बंडगार्डन, स्वारगेट आणि राजगड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. अर्जुन हिराजी भोसले (वय २३), रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे यास ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीकडून जबरी चोरी केलेले दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकी मोटारसायकल असा एकूण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ९ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरताना सतर्कता बाळगावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर, श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. निलकंठ जगताप यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे व तुकाराम हिवाळे यांनी केली




















