Homeक्राईमदृश्यम चित्रपट पाहून पत्नीचा खून: पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लोखंडी पेटीत टाकून...

दृश्यम चित्रपट पाहून पत्नीचा खून: पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लोखंडी पेटीत टाकून जाळले

लोक वार्ता –राज राठोड

पुणे: चित्रपटातील कथानकाला वास्तवात उतरवून पत्नीचा थरारक खून करणाऱ्या पतीचा पर्दाफाश वारजे माळवाडी पोलिसांनी केला आहे. ‘दृश्यम’ चित्रपट पाहून , समीर पंजाबराव जाधव (वय ४२, रा.शिवणे, व्यवसाय गॅरेज) याने पत्नी अंजली जाधव (वय ३८) हिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लोखंडी पेटीत टाकून पेट्रोल व लाकडाच्या सहाय्याने मृतदेह जाळून राख नदीत टाकले.

२६ ऑक्टोबर रोजी अंजली जाधव ही वारजे पुलाजवळून बेपत्ता झाली असे सांगून. समीरने तक्रार दाखल केली आणि वारंवार पोलीस ठाण्यात येऊन चौकशी करत होता. त्याच्या वागणुकीतून पोलिसांना संशय आला. गुन्हा राजगड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असतानाही वारजे माळवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी पीएसआय संजय नराळे आणि पीएसआय नितीन गायकवाड यांना स्वतंत्र तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

दृश्यम चित्रपट पाहून पत्नीचा खून:
पोलिस उपायुक्त संभाजी कदम (झोन ३) यांनी सांगितले की, समीरने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. समीरने एक महिन्यापूर्वीच खूनाची योजना आखली होती. त्यासाठी गोगलवाडी फाट्याजवळ शिंदेवाडी येथे १८,००० भाड्याने गोडाऊन घेतले, लोखंडी पेटी तयार केली आणि लाकडे साठवून ठेवली. २६ ऑक्टोबर रोजी समीरने अंजलीला, हायंडाई 10 (MH12 FU 0864) गाडीतून फिरायला नेले. खडकवासला परिसरातील हॉटेलमध्ये थांबून नाश्ता केल्यानंतर रात्री ८ वाजता गोडाऊनमध्ये नेले. तेथे भेळ खात असताना समीरने अंजलीचा गळा दाबून खून केला. रात्री १० वाजता मृतदेह लोखंडी पेटीत ठेवून पेट्रोल व लाकूड टाकून मृतदेह जाळला. मध्यरात्री १२ वाजता राख नदीत टाकून दिली.

समीर पंजाबराव जाधव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, यातून समीरने पत्नी अंजली जाधव (वय ३८) हिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लोखंडी पेटीत जाळून राख नदीत टाकले, अंजली जाधव यांना दोन मुले आहे, समीर जाधव याने दृश्यम सिनेमा पाहून खून केल्याचे कबूल केले,

सीसीटीव्ही पुरावे आणि कबुली :
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता समीर पत्नीसोबत जाताना दिसला, मात्र परतताना एकटाच होता. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा.श्री संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, मा.श्री. भाऊसाहेब पटारे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे सुचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.निलेश बडाख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस उप निरीक्षक नितीन गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश कर्चे, सुनिल मुठे, योगेश वाघ, शरद पोळ, शिरीष गावडे वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!