Homeक्राईमचतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई; ४८ हजारांचा मुदतेमाल जप्त: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

चतुःश्रृंगी पोलिसांची कारवाई; ४८ हजारांचा मुदतेमाल जप्त: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे | ८ नोव्हेंबर २०२५ — औंध-बाणेर लिंक रोडवरील एका शेतात अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का बारवर चतुःश्रृंगी पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४८हजार ६५० रुपये किमतीचा हुक्का साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जागा मालक, मॅनेजर आणि कामगार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ नोव्हेंबर रोजी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान तपास पथकाला माहिती मिळाली की, सर्वे नं. २२४, औंध-बाणेर लिंक रोडवरील ‘फार्म कॅफे’ नावाच्या ठिकाणी शेतात हुक्का बार बेकायदेशीरपणे चालवला जात आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.

छाप्यात पोलिसांना कॅफेमध्ये ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असल्याचे आढळून आले. घटनास्थळी २० हुक्का पॉट्स, विविध फ्लेवर्स आणि इतर साहित्य असा एकूण ४८ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

कायदेशीर कारवाई व पुढील तपास:  सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ अंतर्गत कलम ४(अ) व २१(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोट हे करत आहेत.

सामाजिक संदेश  :शहराच्या मध्यवर्ती भागात शेताच्या आडोशाने चालणाऱ्या अशा अवैध धंद्यांवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची ठरते. तरुणाईच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हुक्का बार्सवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

तसेच सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, सहा. पो. निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे  यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!