लोक वार्ता –राज राठोड
पुणे– विमानतळ पोलीस स्टेशनच्या दक्ष तपासामुळे घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा मोठा पर्दाफाश झाला आहे. तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ८ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. २९ ऑक्टोबर २०२५) फिर्यादी यांच्या घराचे दरवाजे व गेटचे कडी-कोयंडे अज्ञात चोरट्यांनी कापून १० लाख ५१ हजार ९३ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती.
– तपासादरम्यान पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळावर तपास करून आरोपींचा शोध लावला.
अटक केलेले आरोपी :
1. शिवम दत्ता अवचर (१९ वर्षे) – रा. अभिनव कॉलेज शेजारी, न-हे, पुणे
2. नवनाथ उर्फ लखन बाळु मोहिते (२२ वर्षे) – रा. वैदुवाडी, हडपसर, पुणे
3. एक विधीसंघर्षित बालक – ताब्यात
आरोपींकडून १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
पुढील तपासात उघडकीस :
– आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
– दिवाळीच्या काळात त्यांनी दुकानांचे शटर उचकटून व बंद घरे फोडून केलेले ७ घरफोडीचे गुन्हे कबूल केले.
– या गुन्ह्यांमधून चोरी केलेले २ लाख ६ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि ०४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशन, कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरग म्हस्के, अंबादास चव्हाण व राहुल जोशी यांनी केली.




















