लोक वार्ता –बबलू (राज) राठोड
पुणे : पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली, विश्रामबाग पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन आणि भोसरी पोलीस स्टेशन, येथील एकूण पाच गुन्हे उघड.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी करत पुणे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील कुख्यात ‘सनी गँग’शी संबंधित असलेल्या एका गँगस्टरसह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ६२ लाख रुपये किमतीचे ४०४ ग्रॅम सोने आणि १९१ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय?
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांनी संशयितांचा माग काढला.
वेशांतर करून ठेवली पाळत:
आरोपी चोरी केल्यानंतर परराज्यात पळून गेले होते. मात्र, ते पुन्हा पुण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच, पोलिसांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात वेशांतर करून सापळा रचला. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी आकाश सुभाष (वय २३, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि जितेंद्र चतुर्वेदी (वय ३२, रा. दिल्ली) यांना शिताफीने ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेश कनेक्शन आणि तपास:
अटक केलेला आकाश सुभाष हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान आरोपींनी पुणे रेल्वे स्टेशनजवळील लॉजवर आणि उत्तर प्रदेश, दिल्ली येथे दागिने लपवून ठेवल्याची कबुली दिली. विश्रामबाग पोलीस पथकाने तातडीने दिल्ली आणि उत्तर प्रदेश गाठून तिथून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला.
तपास पथकाची कामगिरी:
जप्त मुद्देमाल: ६२ लाख रुपये किमतीचे सोने व चांदी.
उघडकीस आलेले गुन्हे: पुणे शहरातील एकूण ५ घरफोडीचे गुन्हे उघड.
आरोपींना ६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांनी पुणे आणि दिल्लीत आणखी किती गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री चंद्रकांत भोसले, श्री प्रदिप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडखळकर यानी केलेली आहे.




















