लोक वार्ता –राज राठोड
पुणे | शहरातील गुन्हेगारीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. आंबेगाव पठार, सिंहगड कॅम्पस येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील आठ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव करण भारत गजरमल (वय १९, रा. दभाडी, आंबेगाव बु., पुणे) असे आहे. घटनेनंतर तो फरार राहून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे यांना आरोपी गदा चौक परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली.
याबाबत सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देऊन, व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपीला ताब्यात घेतले. भारती विद्यापीठ पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि.२. पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




















