लोक वार्ता –राज राठोड
पुणे : समर्थ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने हरवलेले तसेच सायबर गुन्ह्यात चोरीस गेलेले तब्बल ८ लाख रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन हस्तगत करून नागरिकांना परत केले आहेत.
हे मोबाईल फोन संबंधित मालकांना मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले यांच्या हस्ते परत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या सी.ई.आय.आर. (CEIR) प्रणालीचा वापर करून समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे तसेच पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे व सुनिता खोमणे यांनी मोबाईल गहाळ व चोरी संदर्भातील तांत्रिक तपास सुरू केला. त्यासाठी हरवलेले मोबाईल्सचे डेटा तयार करून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या तपासामध्ये संबंधित मोबाईल फोन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच इतर राज्यांमध्ये वापरले जात असल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधला, तसेच विविध पोलीस ठाण्यांशी समन्वय साधत एकूण ८लाख रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन (०६ अॅपल आयफोन व ०६ इतर कंपन्यांचे मोबाईल) यशस्वीरित्या हस्तगत केले.
हस्तगत केलेले हे मोबाईल फोन संबंधित मालकांना मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले यांच्या हस्ते परत करण्यात आले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून समर्थ पोलिसांच्या दक्ष व तांत्रिक तपासामुळे हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परी.०१ श्री. कृषिकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक गुन्हे, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. चेतन मोरे यांचे सुचनेप्रमाणे समर्थ पोलीस स्टेशनकडील सायबर पोलीस पथकाचे पोलीस अंमलदार सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनिता खोमणे व अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.




















