लोक वार्ता – राज राठोड
पुणे : शहरातील सर्वात महत्त्वाच्या वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या स्वारगेट परिसरातील कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता वाढत असून महिला, लहान मुले आणि प्रवासी यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कॅनॉलमध्ये अक्षरशः कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. प्लास्टिक, घरगुती कचरा आणि सांडपाण्यामुळे कॅनॉलमध्ये प्रदूषण वाढत असून मागील अनेक दिवसांपासून येथे कोणतीही स्वच्छता मोहीम झालेली नाही, असा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“स्वच्छ पुणे सुंदर पुणे” फक्त भिंतींवर? – पुणेकरांचा सवाल:
पुणे महानगरपालिका “स्वच्छ पुणे सुंदर पुणे” या मोहिमेअंतर्गत भिंती रंगवून शहर सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करते. परंतु जमिनीवरील अस्वच्छतेकडे पालिका दुर्लक्ष करतेय का, असा सरळ सवाल पुणेकर विचारत आहेत. भिंती रंगवण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वच्छता राखण्यावर भर देणे अधिक गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
पालिका अधिकारी फक्त स्वच्छतेचे पोस्टर लावून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत का? असा प्रश्न अनेक प्रवाशांनी उपस्थित केला.
नागरिकांची मागणी : तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी:
स्वारगेट हे शहरातील लाखो प्रवासी वापरत असलेले ठिकाण. येथे स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी PMC ला तातडीने कॅनॉल परिसर स्वच्छता करावी, नियमित साफसफाईचे नियोजन करावे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, प्रकाश वालगुडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की लवकरात लवकर आम्ही येथील परिसर स्वच्छ करून घेऊ,
करीम शेख राहणार पर्वती यांनी सांगितले की, एकीकडे पुणे महानगरपालिका, स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे अभियान राबवून, जनजागृती करत आहे, दुसरीकडे पुणे शहरातील वाहतुकीचे मुख्य ठिकाण असलेल्या स्वारगेट येथील कॅनॉल परिसरात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपऱ्या, जेवणाचे हॉटेल, यांच्याकडून निघालेला कचरा, हे हॉटेल चालक, आणि चहाचे टपऱ्या चालवणारे, व पान टपरी चालवणारे, यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कॅनॉल परिसरामध्ये कचरा टाकण्यात येत आहे, पुणे महानगरपालिकेला सर्व काही माहित असून, पालिका नागरिकांच्या जीवांशी खेळत आहे, स्वच्छतेच्या नावाखाली डोळे झाक करत आहे, असे शेख यांनी सांगितले,
स्नेहा माझी,राहणार. मुकुंदनगर यांनी सांगितले की, स्वारगेट कॅनोन परिसरामध्ये कचरा, पडलेला असून पुणे महानगरपालिकेने सदर ठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे विले वाट लावले पाहिजे, जेणेकरून परिसरामध्ये स्वच्छता राहील, स्वारगेट हे पुण्यातील एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे, या ठिकाणी असलेल्या कॅनॉल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे, कॅनॉल परिसर लवकरात लवकर स्वच्छ करून घेतले पाहिजे, असे माझी. यानी संगीतले.
परेश शिगवण, राहणार कात्रज पुणे, यांनी सांगितले की कॅनॉलच्या इथे मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला आहे, विशेष म्हणजे हा कचरा पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्याला दिसत नाही का?, या दुर्गंधीने नागरिक आजारी पडल्यानंतर पुणे महानगरपालिका जागी होणार आहे का, असे शिगवण यांनी सांगितले.




















