Homeक्राईमबाणेर पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडी करणारे सराईत आरोपी जेरबंद, सोन्याचे मंगळसूत्र...

बाणेर पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडी करणारे सराईत आरोपी जेरबंद, सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम जप्त

लोक वार्ता –राज राठोड

पुणे | बाणेर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा जलद तपास करून बाणेर पोलीस स्टेशनच्या पथकाने तीन सराईत आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला महत्त्वाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत लेन नं. ११, विरभद्रनगर, बाणेर येथे फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकरमधून सोन्याचे मंगळसूत्र व ५० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकांना मार्गदर्शन केले, त्याच अनुषंगाने बाणेर पोलिसांच्या तपास पथकाने लगेच घटनास्थळ आणि आसपासच्या CCTV फुटेजची तपासणी केली. गोपनीय बातमीदारांच्या माहितीद्वारे चोरटे काळेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली.

दोन आरोपींची पहिली अटक – चोरीतील बाईक व रोख रक्कम जप्त

दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी तपास पथकाने कारवाई करत खालील आरोपींना काळेवाडी, पिंपरी-चिंचवड येथून अटक केली—

1. साहील रविंद्र वाघमारे (२३ वर्षे)

रा. हरदेव कॉलनी, विजय नगर, काळेवाडी, पुणे

2. शाकिब उर्फ छोटू शेख (२६ वर्षे)

रा. संजय गांधी नगर, काळेवाडी ब्रिजजवळ, पुणे

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल तसेच चोरीतील रोख रक्कम ३८ हजार रुपये जप्त करण्यात आले.

तपासदरम्यान, गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार : चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे (२७ वर्षे)

रा. विजयनगर, माया मार्केटजवळ, काळेवाडी, पुणे

याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाळत ठेवली. शेवटी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आल्याने गुन्हा पूर्णपणे उघडकीस आला आहे.

अटक आरोपी चेतन वाघमारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकारचे पूर्वीचे गुन्हेही नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाणेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या वेगवान तपासामुळे घरफोडी प्रकरणातील सर्व आरोपी जेरबंद झाले असून, फिर्यादी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील. मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४ श्री. सोमय मुंडे, मा.सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अलका सरग, सपोनि कैलास डाबेराव, सपोनि गणेश रायकर, पोउपनि दिपाली पाटील, पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, रोहीत पाथरुट, मराठे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!