Homeक्राईमपुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक मोहीम; पिस्तूल कारखाना उद्ध्वस्त: ३६ जणांच्या मुसक्या...

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक मोहीम; पिस्तूल कारखाना उद्ध्वस्त: ३६ जणांच्या मुसक्या आवळल्या!

लोक वार्ता –राज राठोड

पुणे | पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत मध्य प्रदेशात भव्य अशा धडक कारवाईत अवैध पिस्तूलनिर्मितीचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. उमरटी गावात करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये तब्बल ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, यंत्रसामग्री व औजारे जप्त करण्यात आली आहेत.

पुण्यात याआधी वेगवेगळ्या गुन्ह्यांतून जप्त करण्यात आलेल्या एकूण 21 अवैध पिस्तुलांच्या तपासातून पोलिसांना महत्त्वाचा धागा लागला. जप्त शस्त्रांचा पुरवठा उमरटी, मध्य प्रदेश येथून होत असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त शस्त्रे असे:

काळेपडळ पोलीस स्टेशन – ४ शस्त्रे

खंडणी विरोधी पथक-१ – २ शस्त्रे

गुन्हे शाखा युनिट-३ – १ शस्त्र

खंडणी विरोधी पथक-२ – ३ शस्त्रे

विमानतळ पोलीस – ११ शस्त्रे

अटक आरोपींच्या चौकशीतही शस्त्रांचा स्त्रोत उमरटीच असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार करून थेट मध्य प्रदेश गाठले.

ही मोठी मोहीम परिमंडळ-४ चे पोलीस उप-आयुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. परिमंडळ-४, गुन्हे शाखा आणि मध्य प्रदेश पोलिसांची संयुक्त टीम—एकूण १०५ अधिकारी व कर्मचारी सहभाग. ड्रोन्सच्या सहाय्याने संपूर्ण परिसरावर सतत नजर ठेवत, माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी उमरटी परिसरात एकाचवेळी धाड टाकून कारखान्यांवर छापे घातले.

चार पिस्तूल बनवणारे कारखाने उद्ध्वस्त:

या धाडीत पोलिसांना अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या चार स्वतंत्र फॅक्टऱ्या सापडल्या.

यामध्ये—

पिस्तूल बनविणे, जुन्या शस्त्रांची दुरुस्ती, राज्यभर आणि बाहेर पुरवठा करणे. अशी संपूर्ण साखळी कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.

मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त:

कारखान्यांमधून पोलिसांनी खालील महत्त्वाचे साहित्य ताब्यात घेतले:

पिस्तूल, काडतुसे, बॅरल, मॅगझिन, ग्राइंडिंग मशीन, विविध कटिंग/शेपिंग औजारे, शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साचे, असे यंत्रसामग्री आणि साहित्य सील करून संपूर्ण कारखाना उध्वस्त करण्यात आला.

जप्त साहित्यातून या रॅकेटचे नेटवर्क राज्यांच्या पलीकडे कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या ३६ जणांकडून चौकशी सुरू असून संपूर्ण पुरवठा व वितरण साखळीचा मागोवा घेण्यावर पुणे पोलिसांचा भर आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक नितीन नाईक, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी कासोदे, पोलीस अंमलदार पठाण, देशमुख, कारखेले, मुंढे, पवार, तांबेकर, रोकडे, रणपिसे, माने, खरात, पानसरे यांनी पुण्यापासुन ५०० किलोमीटर लांब जाऊन यशस्वीरित्या पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यात्री सुरक्षा’ मोहिमेत आरपीएफ पुणेची मोठी कामगिरी; १० लाख ३२ हजाराच्या चोरीचा २ तासांत...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे, दि. १८ एप्रिल २०२६ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणेने अतिशय वेगाने कारवाई करत...

मसाज सेंटरच्या आड देहव्यापार; गुन्हे शाखेची कारवाई, ५ महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल,...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे | पुण्यातील दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

error: Content is protected !!