लोक वार्ता – राज राठोड
पुणे : बंडगार्डन पोलिसांनी, दरोड्याच्या तयारी मध्ये असणाऱ्या आरोपींना सापळा रचून अटक केली आहे, कारवाई करून संभाव्य दरोडा रोखण्यात यश मिळवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या आदेशानुसार पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना थेट गुन्ह्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.
घटनास्थळ जुने रेल्वे सिमेंट गोडाऊन, मालधक्का चौक येथील निर्जन परिसर. येथे काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार कृष्णकांत श्रीराम, ज्ञानेश्वर गायकवाड व राजू धुलगुडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
त्यानंतर पोलीस उप-निरीक्षक धीरज गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सापळा रचून तीन इसमांना ताब्यात घेतले. संशयितांची नावे अशी—
1) जानमोहम्मद नसरुद्दीन शेख, वय 32 , रा. पीर वस्ती, वडकी. 2) सतीष ज्ञानेश्वर शिरोळे वय 35 , रा. पुणे स्टेशन फिरस्ता, मुळ गाव दहीटणे, दौंड. 3) शिवप्रकाश कुमार वय 23, रा. स्वारगेट कॅनाल,
अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य तसेच एकूण सहा मोबाईल फोन आढळल्याने ते मुद्देमालासह जप्त करण्यात आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली.
तपासादरम्यान आरोपींच्या कबुलीजबाबातून बंडगार्डन पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ३५०/२०२५ मधील आणखी एक गुन्हा उघडकीस आला. भा.न्या.सं. कलम ३०९ (६), ३ (५) अंतर्गत दाखल या गुन्ह्यात वापरलेले दरोड्याचे साहित्य तसेच चोरीचे मोबाईल फोन मिळून ३२ हजार,१६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, कृष्णकांत श्रीराम, सुर्यकांत राणे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड व राजु धुलगुडे यांनी केली आहे.




















