Homeक्राईमकात्रज :भिक मागण्यासाठी, २ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण: आरोपींना धाराशिव तुळजापूर येथून अटक,...

कात्रज :भिक मागण्यासाठी, २ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण: आरोपींना धाराशिव तुळजापूर येथून अटक, ५ जणांच्या टोळीचा पर्दाफाश

लोक वार्ता न्यूज – राज राठोड

पुणे – शहरात घडलेल्या धक्कादायक प्रकारात झोपेतून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे तब्बल २४ तासांच्या शर्थीच्या शोधानंतर आरोपींच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट-२च्या संयुक्त पथकाने धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे केली. अपहरण करुन चिमुकलीला भिक मागण्यासाठी नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

घटना दिनांक २५ जुलै रोजी रात्री ९ ते २६ जुलै १:३० च्या दरम्यान, कात्रज पाण्याचे टाकीजवळ, वंडर सिटी,झोपडपट्टी परिसरात घडली. फिर्यादीच्या दोन वर्षांच्या मुलीला कोणीतरी झोपेतून उचलून नेल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तात्काळ गुन्हा दाखल करत पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली. शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून एक महिला आणि दोन पुरुष दुचाकीवरून पीडित मुलीस पुणे रेल्वे स्थानकात नेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात हे आरोपी आणखी दोन व्यक्तींना घेऊन तुळजापूर, धाराशिव येथे गेले असल्याची माहिती समोर आली.

त्याठिकाणावरुन आरोपींची चेहरे स्पष्ट करुन त्या आरोपींची गोपनिय माहीती घेतली असता आरोपी हे तुळजापुर, जि. धाराशीव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहीती भारती विद्यापीठ तपास पथक व गुन्हे शाखा, युनिट ०२, पुणे यांना मिळाली. पोलिसांनी खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट २ चे सपोनि आशिष कवठेकर आणि पोउपनि मोकाशी , व भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक तुळजापूरला रवाना केली. स्थानिक एलसीबीच्या मदतीने त्यांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधून पाच जणांना अटक करून. आरोपींकडून अपहरण झालेली मुलगी सुखरूप मिळाली.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:

1. सुनिल सिताराम भोसले (वय ५१) – मजूर, तुळजापूर

2. शंकर उजन्या पवार (वय ५०) – पारधी वस्ती, तुळजापूर

3. शालुवाई प्रकाश काळे (वय ४५) – पारधी वस्ती, तुळजापूर

4. गणेश बाबु पवार (वय ३५) – पारधी वस्ती, तुळजापूर

5. मंगल हरफुल काळे (वय १९) – , खडकी पुणे

या आरोपींनी मुलीचे अपहरण केवळ भिक मागण्यासाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी ही कारवाई अत्यंत कौशल्याने आणि वेगात पूर्ण केली आहे,
पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे .

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम, गुन्हे शाखा युनिट ०१ पुणेकडील पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाटगे, तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ पुणेकडील पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि वैभव मगदुम, भारती विद्या पो स्टे कडील सपोनि स्वप्नील पाटील, पोउपनि निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, तसेच गुन्हे शाखा २ कडील पोलीस अंमलदार जाधव, शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, सद्दाम तांबोळी, शुभम देसाई, मयुर भोसले, निलेश साबळे, अमित जमदाडे तसेच धाराशिव एल सी बी चे पोहवा समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!