लोक वार्ता न्यूज – राज राठोड
आंबेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत तीन मोटारसायकल चोरांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २ लाख रुपये किंमतीच्या ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
दि. २७ जुलै २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना जांभुळवाडी तलावाजवळून आंबेगाव गावठाणकडे जात असलेल्या तीन संशयित तरुणांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:
1. नरेंद्र सुखदेव झुरंगे (वय १९),
2. सुयश सुनिल दुधाळ (वय १९),
3. प्रज्वल गंगाधर टिळेकर (वय १९),
सर्व रा. खळद एखदपूर, ता. पुरंदर, जि. पुणे.
सखोल चौकशीदरम्यान या तिघांनी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तपासात पुढील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत:
१)आंबेगाव पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीचा १ गुन्हा.
२) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीचे ३ गुन्हे.
ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व तपास कौशल्यामुळे शक्य झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांच्याकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व रतिकांत कोळी, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, बापु भिंगारे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे तसेच कॉप्स २४ मार्शलचे दिपक गायकवाड, दत्तात्रय मेंगाळ, सागर खंडागळे, किरण कांबळे यांच्या पथकाने केली.




















