लोक वार्ता न्यूज – राज राठोड
पुणे: हडपसर पोलिसांकडून वाहनचोरीचा तपास करताना ३ सराईत आरोपी आणि २ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ११ महागड्या दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून एकूण १२लाख ३०हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परि. ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर लक्ष केंद्रीत करत कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.
त्याअनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथकाची बैठक घेऊन ठोस कार्ययोजना आखली आणि २० जुलै ते २७ जुलै २०२५ या कालावधीत तपास अधिकाऱ्यांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले:
1. अमन ऊर्फ परश्या भोला तिवारी (वय १९) – रा. माळवाडी, हडपसर
2. मोहम्मद अशरफअली ईम्तीयाजअली अजमेरी (वय २०) – रा. सुक्रे वस्ती, खराडी
3. प्रणव गणेश जमादार (वय २०) – रा. वडगावशेरी
4. दोन विधीसंघर्षित बालक
या आरोपींकडून खालीलप्रमाणे ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या:
२ बुलेट, २ ड्यूक, १ यामाहा एफझेड, ४ हिरो स्प्लेंडर,
२ होंडा अॅक्टीवा
या तपासात आतापर्यंत एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. हे गुन्हे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेले होते. त्यामध्ये:
हडपसर पोलीस स्टेशन – ५ गुन्हे, मुंढवा पोलीस स्टेशन – २ गुन्हे, बंडगार्डन, विमाननगर, विश्रामबाग, देहूरोड पोलीस ठाणे – प्रत्येकी १ गुन्हा
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या सततच्या मेहनतीमुळे शक्य झाली.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परि- ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अश्वीनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने कामगिरी केली आहे.




















