लोक वार्ता – राज राठोड
पुणे – कात्रजमधील संतोषनगर परिसरात दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.१५ वाजता दोन अनोळखी महिलांनी, फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. हा प्रकार ओम किराणा दुकानासमोर, साई मित्र मंडळ गणपती मंदिराजवळ घडला.
फिर्यादी महिलेला पिवळ्या धातूचे मणी दाखवून “हे सोन्याचे असून तुमच्या मंगळसूत्रापेक्षा जड आहे” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन आरोपी महिला घटनास्थळावरून पसार झाल्या.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २६८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून कात्रज ते सासवड मार्गावरील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपी महिला सासवडमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना बातमीदारामार्फत आरोपींच्या वास्तव्यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर पोउपनि मोहन कळमकर, अंमलदार अजय कामठे, शिवाजी पाटोळे व महिला अंमलदार दिक्षा मोरे यांनी सासवडमध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या महिला:
१) आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०), रा. नदी पत्रा जवळील पत्र्याचे रूम, जुना कोडीत रोड, सासवड – मूळ रा. ढोला झोपडपट्टी, भावनगर, गुजरात
२) सोनूबेन आकाशभाई सरवय्या (वय ३०), रा. सासवड
जप्त मालमत्ता:
– ८ ग्रॅम वजनाचे, दोन वाट्यांचे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र
– अंदाजे किंमत: १लाख २हजार .
आरोपी महिलांनी आणखी कोणाला अशा प्रकारे फसवले आहे का, याची देखील चौकशी सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस फौजदार शैलेंद्र साठे करत आहेत.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अनोळखी व्यक्तींकडून सोन्याचे वस्तू विकत घेण्यापूर्वी खात्री करणे अत्यावश्यक आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक तपास कौशल्य कौतुकास्पद आहे.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. मिलींद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे मपोशि दिक्षा मोरे यांच्या पथकाने केली.




















