Homeक्राईमवानवडी पोलिसांची धडक कारवाई: फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज लावुन जुगार खेळणारे व...

वानवडी पोलिसांची धडक कारवाई: फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज लावुन जुगार खेळणारे व कोंबड्यांना क्रुरपणे वागणुक देणाऱ्या ६ आरोपींना केले जेरबंद

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे | १९ ऑक्टोबर २०२५  

वानवडी पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे घोरपडी परिसरात धाड टाकून पैशांवर कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या आणि प्राण्यांशी क्रूर वागणूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली. ही कारवाई इम्प्रेस गार्डनच्या मागील बाजूस, बंगला क्रमांक २ जवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.

पोलीस अंमलदार गोपाळ मदने आणि अमोल पिलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम सार्वजनिक ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत आहेत. तपास पथकाने तत्काळ ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा रचला आणि अचानक छापा टाकून सहा आरोपींना रंगेहात पकडले.

अटक केलेले आरोपी:  

1. अमोल सदाशिव खुर्द (वय ४७, रविवार पेठ)  

2. मंगेश आप्पा चव्हाण (वय ५५, भवानी पेठ)  

3. निखिल मनिष त्रिभुवन (वय २०, घोरपडी)  

4. अमिर आयुब खान (वय २८, घोरपडीगाव)  

5. सचिन सदाशिव कांबळे (वय ४२, भवानी पेठ)  

6. प्रणेश गणेश पॅरम (वय २७, कॅम्प)

हस्तगत मुद्देमाल:  

– ६ रंगीबेरंगी फायटर कोंबडे  

– ६ तंगुस पिशव्या  

– ३ मोटारसायकल  

– ५ मोबाईल हँडसेट  

– ₹२५८०/- रोख  

एकूण किंमत: ५लाख ११हजार ८८०

कायदेशीर कारवाई:  

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(ब) आणि प्राण्यांना क्रूर वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमाच्या कलम ११(इ)(न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. ४२४/२०२५ नुसार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.

प्राण्यांवर क्रूरता करणाऱ्या आणि जुगारासारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची ही कारवाई समाजात कायद्याचे भान निर्माण करणारी ठरते.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे. पुणे शहर भाऊसाहेब पाटील, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. विजयकुमार डोके यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद व सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!