Homeक्राईमदिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'ॲक्शन मोड' मध्ये; समर्थ पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या सराईत...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ‘ॲक्शन मोड’ मध्ये; समर्थ पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोक वार्ता –राज राठोड
​पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस अधिक सतर्क झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत. याच अनुषंगाने पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला लाखोंचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​​दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडल्या संदर्भात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी हे दिवाळी सणानिमित्त पूजा करण्यासाठी घरातील लाकडी कपाटाकडे गेले असता, त्यांना कपाटाचा ड्रावर उचकटलेला दिसला. ड्रावर तपासला असता त्यामध्ये ठेवलेले पन्नास हजार रुपये रोख, दोन तोळ्यांची सोन्याची चैन आणि एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तात्काळ समर्थ पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ​गुन्हा दाखल होताच,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती काढून,अज्ञात चोरट्याचा मागोवा काढला. अथक प्रयत्नानंतर तपास पथक घरफोडी करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहचले आणि त्याला ताब्यात घेतले.​पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने आपले नाव शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९ वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर, जोशी प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे सांगितले. याच आरोपीने समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी खंडागळे याच्यावर यापूर्वीही सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

​आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल:
​२० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (१)
​१० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या (२)
​६.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (१)

​समर्थ पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे चोरीच्या घटनांवर वचक बसण्यास मदत झाली असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील आपल्या मौल्यवान वस्तू आणि घराच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे व भाग्येश यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!