Homeक्राईमहुंडाबळीचा आरोप : लग्नाच्या एका वर्षातच नवविवाहितेची आत्महत्या, सासरच्या ७ जणांवर गुन्हा...

हुंडाबळीचा आरोप : लग्नाच्या एका वर्षातच नवविवाहितेची आत्महत्या, सासरच्या ७ जणांवर गुन्हा दाखल

लोक वार्ता – राज राठोड 

आंबेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी २७ वर्षीय नवविवाहिता स्नेहा विशाल झेंडगे 

हिने शुक्रवार (दि. ९ ऑगस्ट) रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची स्नेहाच्या वडिलांकडून सांगण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे, मृत विवाहितेचे नाव स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे असून, ती मूळची सोलापूर येथील होती. तिचे लग्न मे २०२४ मध्ये झाले होते. घटनेच्या वेळी ती घरात एकटी होती.

या प्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पती विशाल झेंडगे, सासरे , सासू , मेहुणा , नणंद तेजश्री ठीते, तेजश्रीचे पती परमेश्वर ठीते, तसेच नातेवाईक कोल्हाळ यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, स्नेहाला लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. सासरकडील मंडळींच्या वारंवार पैशाच्या मागण्यांमुळे घरात वाद, भांडणे होत असत. अखेरीस पतीच्या व्यवसायासाठी २० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. या दरम्यान तिला मानसिक छळासोबतच मारहाणही सहन करावी लागली.

घटनेच्या दिवशीही रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावांकडून पैसे आणण्याची सक्ती करण्यात आली, अन्यथा येण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पती-पत्नीमधील वाद प्रकरणी सोलापूर हद्दीत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, जुलै महिन्यात दबावामुळे व भवितव्य बिघडू नये म्हणून दोघांनी तडजोड करून गुन्हा मागे घेतला होता. पती विशाल झेंडगे हे खर शिवपुरा येथे लहानसा व्यवसाय करतात व ते भाड्याच्या घरात राहत होते. वादातूनच स्नेहाने टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी तपास सुरू असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!