लोक वार्ता – राज राठोड
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जलद आणि अचूक कारवाई करून सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला आहे. ही कारवाई दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सर्प उद्यानकडून मोरे बाग बस स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या फुटपाथवर एक इसम गावठी कट्टा घेऊन थांबलेला आहे.
सदरची माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना दिले असता, त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयित इसम तौकीर रफिक शेख (वय १९, रा. मक्का मस्जिद जवळ, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्याच्याकडे ५०हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७७/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि.२ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




















