Homeक्राईमपरराज्यातील आरोपीकडून अफु बोंडे हा, अंमली पदार्थ जप्त – भारती विद्यापीठ पोलिसांची...

परराज्यातील आरोपीकडून अफु बोंडे हा, अंमली पदार्थ जप्त – भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

लोक वार्ता – राज राठोड
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने राजस्थानमधील एका आरोपीकडून तब्बल ५.२५० किलोग्रॅम वजनाचे अफु बोंडे/टरफले हा नशाकारक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ९५ हजार २२० रुपये आहे,

ही कारवाई, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले व किरण सावळे हे पेट्रोलिंग करत होते.

या वेळी नॅन्सी लेक होम सोसायटीकडून लेकटाऊनकडे जाताना, पदमजा पार्क सोसायटीच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर पोलिसांना संशयित व्यक्ती आढळून आली.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याचे नाव मांगीलाल पुनाराम रहाड (वय २९ वर्षे) असे समोर आले. तो सध्या अप्पर इंदिरानगर बस डेपो चाळी, बिबवेवाडी, पुणे येथे वास्तव्यास असून मूळचा करवाडा, ता. राणीवाडा, जि. जालौर, राजस्थान येथील आहे. त्याच्या ताब्यातील पोत्याची झडती घेतल्यावर ५ किलो २५० ग्रॅम वजनाचे अफु बोंडे/टरफले असा, बंदी असलेले नशेसाठी वापरणारे अंमली पदार्थ आढळून आला.

अंमली पदार्थ बाळगणे व विक्रीसाठी ठेवणे हा कायद्याने गुन्हा असल्याने, आरोपीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते  मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, किरण साबळे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!