Homeक्राईमसराईत मोटारसायकल चोरास अटक; १लाख६० हजाराचा मुद्देमाल जप्त

सराईत मोटारसायकल चोरास अटक; १लाख६० हजाराचा मुद्देमाल जप्त

लोक वार्ता –राज राठोड

पुणे,: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड पोलीस स्टेशनने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली असताना , मार्केट यार्ड पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोराला अटक केली आहे, या कारवाईत एकूण १लाख ६०हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांच्या आदेशानुसार, तपास पथकाने परिसरात पेट्रोलिंग सुरू केले होते. यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत यांना एक संशयित इसम मोटारसायकलवर जाताना दिसला. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर यांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र तत्परतेने कारवाई करत तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याचे नाव अनिल गणेश बिरादार (वय २५, रा. महादेव कॉलनी, लोहगाव) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे असलेल्या MH-12-EU-2530 क्रमांकाच्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता, त्याने ती मार्केटयार्ड गेट नं. १ येथून चोरी केल्याची कबुली दिली.

सदर प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अधिक तपासात आरोपीने मार्केटयार्ड परिसरातून आणखी तीन मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले असून संबंधित गुन्ह्यांचीही नोंद घेण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपीकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परि-०५ पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीस अंमलदार दत्ता राऊत, राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, महेश जेधे, किरण जाधव, नितीन झेंडे व आशिष यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!